चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

परिचय ग्रंथ

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश या प्रकल्पाचा परिचय या ग्रंथात करून दिला आहे. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गेल्या दोनशे वर्षात जी परिवर्तने झाली, त्यांचा सूत्ररूपाने आढावा या परिचय ग्रंथातून घेतला आहे. त्या त्या क्षेत्रातील शिल्पकारांचे महाताष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोणतीही संस्कृती हि कर्तृत्वसंपन्न त्याबरोबरच सर्वसामान्य अशा सर्व माणसांचा सक्रीय योगदानातून बनत असते. या जडणघडणीचा वेध घेण्याच्या हेतूने चरित्रकोशाचा उपक्रम योजला आहे. चरित्रकोशाचा कालखंड गेल्या दोनशे वर्षांचा असला, तरी कोणताही इतिहास हा कोर्या पार्श्वभूमीवर घडत नाही. त्यमुळे १९ व्या शतकात परिवर्तनाची जी उर्जा तयार झाली आणि तिचे जे स्वरूप प्रकट झाले, त्यला तत्पूर्वी घडलेल्या घडामोडींचा संदर्भ होता. त्यामुळे या प्रकल्पातील पहिला खंड हा १९ व्या शतकातील घडामोडीमागील पार्श्वभूमी स्पष्ट करणारा आहे. जीवन ही तर अखंड चालणारी प्रक्रिया आहे. जो परिवर्तनाचा सुयोग्य वेध घेवू शकतो, तोच या प्रक्रियेमध्ये शिल्पकार बनू शकतो, त्यामुळे आगामी काळातील भावी शिल्पकारांना प्रेरक व दिशादर्शक ठरेल, अशी १२ व्या खंडाची भविष्यवेधी रचना राहणारा आहे. परिचय ग्रंथात काही निवडक व्यक्तींच्या चरित्रनोंदी दिल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती हा आधुनिक महाराष्ट्राच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या टप्प्यापर्यंत घडलेल्या महत्वपूर्ण घटनांवर आधारित एक चित्रमालिका या ग्रंथात देण्यात आलेली आहे. या प्रकल्पाद्वारे सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत कर्तृत्व संदेश पोहोचवून तिला भविष्यकाळात सक्रीय बनवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्यांचा प्रारंभ परिचय ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने होत आहे.