चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

खंड

विज्ञान व तंत्रज्ञान

प्रत्येक देशाची,राज्याची एक स्वतंत्र ओळख असते. आजच्या भाषेत बोलायचे झाले तर त्याला त्या राज्याचा बॅंड असे म्हणता येईल. आज शिक्षण हा महाराष्ट्राचा ब्रॅंड होउ शकतो. कारण आज जो महाराष्ट्र आपण पाहतो तो घडवणार्‍या सर्व समाजसुधारकांनी शिक्षण हे समाजप्रबोधनाचे माध्यम वापरुन आपल्या समाजात सामाजिक व राजकीय सुधारणा घडवून आणल्या होत्या.
आपली भारतीय शिक्षण पध्दती म्हणजे पूर्वापार धर्माधारित शिक्षण पध्दतच होती. इंग्रजी आक्रमणानंतर काळे इंग्रज तयार करण्यासाठी का होईना, पण मेकॉलेप्रणित शिंक्षण पध्दती रुढ झाली. परंतु या शिक्षण पध्दतीचा जसा इंग्रजांना आपला राज्यशकट चालविण्याकरीता उपयोग झाला त्याचप्रमाणे स्वदेशबांधवांत स्वाभिमान व आत्मभान जागविणारे थोर पुरुष पुढे आले.
बोला, लिहा, वाचा, पढवा
अशा नाना युक्ती लढवा,
जगी आपुली पदवि चढवा, ज्ञानसोपानी वरउवर
असा संदेश मुंबईचे आद्य शिल्पकार नाना तथा जगन्नाथ शंकरशेट यांनी दिला.
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले असे म्हणून महात्मा जोतिबा फुले यांनी अविद्येने केलेले अनर्थ समाजासमोर मांडून शूद्रातिशूद्रांच्या उत्थानासाठी काम केले.
स्त्रीशिक्षणाचा वसा चालिविणार्‍या सावित्रीबाई फुले, इंग्रजांच्या ज्ञानप्रसाराची व त्यांच्या शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता हेरून इंगजी भाषेला वाघिणीचे दूध संबोधणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळराव आगरकर, न्यायमूर्ती म.गो.रानडे, महर्षी अण्णासाहेब कर्वे , ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, सयाजीराव गायकवाड, डॉ. काशिनाथ तेलंग, छत्रपती शाहू महाराज, रखमाबाई राउत, काशीबाई कानिटकर, पंडित श्री.दा. सातवळेकर यांचे योगदान आणि खासगी शिक्षणसंस्थाचेही कार्य महत्त्वाचे आहे.
लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या संकल्पनेतून साकारलेले न्यू इंग्लीश स्कूल व फर्ग्युसन महाविद्यालय या शिक्षणसंस्था, वि. गो. विजापूरकर यांचे समर्थ विद्यालय. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभा करणारे कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच स्वामी रामानंद तीर्थ, आचार्य विनोबा भावे, श्री.म.माटे, केशव गंगाधर देशपांडे, पां.श्री.आपटे गुरुजी, जे.पी.नाई यांचे कार्यही महत्त्वाचे आहे. सैनिकी शाळेचे प्रवर्त, डॉ.बाळकृष्ण मुंजे, विशुद्धशिक्षण संस्थेचे बाबजी दाते, ज्ञानप्रबोधिनीचे अप्पा पेंडसे, नई तालीम शिक्षण चळवळीतील आशादेवी नायकम्, पाबख विज्ञान आश्रमाचे डॉ. कलबाग, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे, आधुनिक शिक्षणतज्ञ पु, ग, सहस्त्रबुद्धे यांचेही कार्य उल्लेखनीय आहे.
व्यवसायाभिमुख शिक्षणप्रणाली, नंतर निर्बंधरहित क्षमताधारित शिक्षण व स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचे झालेले सार्वत्रिकीकरण नवा आकृतिबंध महाराष्ट्र राज्य शिक्षण शास्त्र संस्थेची स्थापना, लष्करी शिक्षण, रात्रशाळा, मुक्तविद्यापीठ अशा अनेक अनुषंगिक कार्यक‘माचा शैक्षणिेक धोरणात अंतर्भाव अशा तर्‍हेने ज्ञानविज्ञज्ञनाच्या अनेक शाखेपशाखा विकसित झाल्या.
आज जगात व देशभरात महाराष्ट्रीय तंत्रज्ञ आणि विशेषज्ञ यांचे नाव गाजत आहे. देशभरातून तसेच विदेशातूनही शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरात विद्यार्थ्यांचा प्रचंड ओघ येत आहे. अपारंपरिक शिक्षणपद्धीच्या विविध शाखा महाराष्ट्रात सर्वार्थाने बहरल्या आहेत. आधुनिक शिक्षण पद्धीत वेगवेगळ्या विनाअनुदानित खाजगी संस्थांचाही महत्त्वाचा सहभाग आहे. समाजातील सर्व थरात शिक्षण पाझरविण्यासाठी त्यसांच्या माध्यामातूनही मोठे कार्य घडून आलेले आहे. तसेच शिक्षण प्रसाराला सहाय्यभूत होणारी जी संस्थात्मक कामे ज्या मंडळींनी स्वप्रेरणेने घडवून आणली त्यांचाही नामोल्लेख होणार आहे. यात मराठीतर व्यक्तींचे योगदान देखील महत्त्वाचे आहेत. टाटांच्या नावे सुरु झालेल्या उच्च स्तरावरील विविध संस्था, साधू वासवानी तसेच ख्रिश्चन, मुस्लीम, पारशी या समाजाच्या संस्था व संस्थापकांची दखल घेतली जाणार आहे.
हे शिक्षण क्षेत्रातील परिवर्तन नेमके कसे घडले आणि ते कुणी घडवून आणले याचा मागोवा घेणे हे केवळ माहिती म्हणून मनोरंजक नाही तर यात आणखी विकास होउ शकतो ही प्रेरणाही यातून मिळू शकते. शिक्षण खंड सिद्ध करण्याचा हाच मुख्य हेतू आहे.