चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

खंड

लोककला व लोकसाहित्य

लोकजीवनाचे प्रतिबिंबि
कोणत्याही कालखंडातील लोकजीवनाचा अभ्यास करताना बदलती रूपे आणि बदलते संदर्भ यांसह लोकसाहित्याच्या आणि लोककलांच्या लोकसाहित्याशास्त्रीय अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कारण त्यातून लोकजीवन समग्रेतेने प्रकट होत असते. त्यात स्वाभाविकच आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा सर्वच अंगांचा समावेश असतो. या सर्व अंगांचे दर्शन घडविण्याचे, निदान जीवन कसे होते किंवा आहे, याचे प्रत्ययकारी सूचना करण्याचे कार्य लोकसाहित्य आणि लोककला यांतून घडते. कोणताही नवा आक्रमक बदल किंवा क्रांतिकारक बदलदेखील लोकजवन प्रवाहाला उखडून टाकू शकत नाही; हे केवळ लोकसाहित्याच्या अभ्यासानेच स्पष्ट होऊ शकते. वर्तमानातील बदलते संदर्भ, लोकजीवनाची आणि लोककलांचा अभ्यास म्हणजे गतगोष्टींचे जतन करण्याची धडपड, एवढ्या मर्यादित अर्थाने विचार करणे आत्मघातकीपणाचे ठरते. लोकजीवनाच्या आरंभबिंदूपासून लोकजीवन कालौघात कसे-कसे बदलत गेले, हे पाहण्यासाठी, स्वत्वाचे मूळ शोधण्यासाठी, गतगोष्टी जतन करणे, हे आवश्यकच काय परंतु अतिमहत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर वर्तमानातील बदलत्या स्वरूपात गतजीवनाचे अवशेष कसे घट्टपणे प्रकट होतात, हे पाहणेही महत्त्वाचेच असते. समग्र पारंपरिक लोकजीवन शास्त्रांच्या व कलांच्या अवस्थांतरांसह समजून घेण्याचाच तो खटाटोप असतो.
लोकसाहित्य व लोककला यांचे हे स्वरूप लक्षात घेऊन आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडण प्रक्रियेत लोकसाहित्य विशारद, लोककलावंत, लोकसाहित्य व लोककला या संदर्भातील कार्य करणाऱ्या संस्था, शासकीय प्रयत्न या सर्व गोष्टींचा साक्षेपाने परिचय करून घेणे योग्य होईल.
इंग्रजी राजवटीत आधुनिक विचारधारांमुळे एकूण लोकजीवनाला आणि लोककलांना प्रचंड हादरे बसले. परंतु संदर्भ येत राहिले. बदलती रूपेही समोर दिसू लागली. परंपरांच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात आल्याने संकलन, संपादन, पुनरूज्जीवन, सादरीकरण, सादरीकरणात नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न, लोकसाहित्याचा अभ्यास आणि लोककलांचा अभ्यास व जतन यांसाठी चळवळी निर्माण झाल्या. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात लोकसाहित्य व लोककला या क्षेत्रांत अभ्यासक म्हणून काम करणारे, सादरीकरण करणारे, लोकचळवळी करणारे अशांचा एक वर्ग तयार झाला. अभ्यासाला विद्यापीठाय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त झाली. या सर्वांच्या कार्याचे स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे.

 

विचारांना नवी दिशा:
लोकसाहित्याच्या अभ्यासामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि वाड्‌मयीन क्षेत्रांना अभ्यासाची एक दिशा मिळाली आहे. या अभ्यास-प्रयत्नांमुळे क्षेत्रीय आणि स्तरीय लोकजीवनाचे सांस्कृतिक, सामाजिक, भाषिक स्वरूपाचे पारंपरिक, परिवर्तनात्मक, वर्तमानकालीन अशा विविध अंगांनी दर्शन घडणे शक्य झाले आहे. भविष्यकाळाचा वेध घेता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय, औद्योगिक, कृषिविषयक, शास्त्रीय, आर्थिक या क्षेत्रांत यथोचित बदल घडविण्यासाठीचे मार्गदर्शन घडले आहे, घडत आहे. या सर्व क्षेत्रांतील चळवळींना दिशा आणि बल प्राप्त झाले. इंग्रजपूर्व एकसंध, एकात्म सामाजिक स्थितिगती आणि इंग्रजी अमलाने सहेतुकपणे रूजविलेली पृथगात्मता यांचे यथोचित भान येण्यास मदत झाली आहे. स्त्रीजीवन; दलित, ग्रामीण, आदिवासी यांचे जीवन मुळातून अभ्यासण्यास मदत झाली आहे. साम"ाज्यावादी, स्वार्थांध, सत्तापिपासू वृत्तींनी त्यात जाणीवपूर्वक भेदमूलकता आणण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वांगाने उघड झाले आहेत. भारताने स्वीकारलेल्या लोकशाही समाजव्यवस्थेला भारतीय सांस्कृतिक मूलाधार गवसले आहेत. या आणि अशा सर्व दृष्टींनी इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तीनही कालांतील लोकजीवनाचे स्वरूप, त्यातील साक्षेप आणि विक्षेप, त्यातील एकात्म संवेदना आणि विखारी संवेदना यांचे यथोचित भान येण्यास मदत झाली आहे. या सर्व गोष्टींच्या पलीकडे वैश्विक जाणिवतील महाराष्ट्र लोकपुरूषाचे यथातथ्य दर्शन घडण्यास मदत झाल्यामुळे महाराष्ट्राची प्रगल्भता वाढण्यास मदत झाली आहे.
महाराष्ट्रात मेरी फि"अर यांनी 1868 साली जश्रव ऊशललरप ऊरूी नावाच्या लिहिलेल्या पुस्तकात ऐतिहासिक दंतकथा, लोककथा संकलित केल्या आहेत. श्री. एनथोव्हेन यांनी केलेले कार्य, किनेकैड सी.ए. यांचे कार्य, मॅक्सम्युलर वेडलिंग, एन. आगरकर, ए.एम.टी. जॅक्सन आदींनी केलेल्या लोकसाहित्यविषयक कार्याने अभ्यासाला गती मिळाली. या प्रांतातही सदाशिव काशीनाथ छत्रे, राजाराम शास्त्री भागवत, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेवशास्त्री कुंटे, काशीनाथ वामन लेले, वा.गो. आपटे, ए.एम.टी. जॅक्सन, ग.ना. देशपांडे, श्री. नवरे, य.रा.दाते, चिं.ग. कर्वे, अं.रा. गाडेकर, विष्णू दिवाकर वैद्य, वि.का. राजवाडे, ना.गो. चापेकर, शं. गो. दाते, द.वा. पोतदार, डॉ. केतकर, वि. स. सुखटणकर, वा.दा. मुंडले, म.वि.डोंगरे, वि. स. सोहोनी, ग.त्र्यं. देसाई, अंबुताई गोखले, कृ.गो. साठे, वि.म. घुले, एस.के. गोखले, सुशीलाबाई नवरे, अ.य.देशपांडे, वि.वा.जोशी, डॉ. गो.रा. प्रधान, श्री. म. वर्दे, वा. रा. प्रभू, अनसूया भागवत, दुर्गा भागवत, ना. ना. हूड, गो. वि. राजगुरू, रा. ना. केळकर अशी लोकसाहित्यासाठी योगदान देणाऱ्यांची यादी डॉ. दुर्गा भागवतांनी दिली आहे. प्रयत्न करणाऱ्या या लोकांना भारत इतिहास संशोधन मंडळ, महाराष्ट्र साहित्य पतिका, स्त्री मासिक, खेळगडी मासिक आदी संस्थांनी व नियतकालिकांनी माध्यम मिळवून दिले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत थेट लोकसाहित्याचा उपयोग करण्याचे कार्य लोकमान्य टिळक आणि त्यांची परंपरा तसेच महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची परंपरा यांनी केले. त्यातून स्वत्व जागरण आणि समाजप्रबोधन घडले. साने गुरूजींपासून महाराष्ट्रातील लोकसाहित्याच्या अभ्यासाला व्यापक परिप्रेक्ष प्राप्त झाला. समग" सांस्कृतिक जीवन लोकसाहित्यातून प्रकटते. लोकसाहित्याच्या अभ्यासाने स्वत्वाचे जागरण होईल, हे लक्षात आले. त्यांच्या परंपरेत कालेलकर, चोरघडे, कमलाबाई देशपांडे इत्यादींनी महत्त्वाचे काम केले. या परंपरेने लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या संकलनाचा चालना दिली. वि.ग. भिडे, मा. के. काटदरे, ज.ना. ढगे, श्री. रा. पारसनीस, मालतीबाई दांडेकर, लीला नणदीर, श्रीराम अत्तरदे, वि. वा. जोशी, भ. श्री. पंडित, कुमुदिनी रांगणेकर, लीला दुबे, रतनलाल शहा, रा. म. आठवले, शं. ग. दाते, ना. र. गोरे, सरोजिनी बाबर अशा अनेक प्रयत्नशील संकलक-संग"ाहकांनी लोकसाहित्याचे संकलन करून ते प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. सह्याद्री, साहित्य, भगिनी, सत्यकथा, विविधवृत्त, ज्योत्स्ना, नवयुग, वाड्‌मयशोभा, यशवंत, धनुर्धारी, मौज, अभिरूची, माऊली, मन्वंतर, संजीवन, नवभारत, प्रसाद मंदिर व प्रसाद या नियतकालिकांनी यांना माध्यम उपलब्ध करून दिले. हे सर्व संकलनाचे प्रयत्न प्रामु"याने मौखिक परंपरांचे अर्थात लोककथा, लोकगीते, म्हणी, उखाणे, वाक्प्रचार, पुुराणकथा संग"हित करणारे होते, अर्थात शब्दपरंपरा संग"हित करणारे होते या प्रयत्नांना लोकसाहित्यशास्त्रीय बैठक नव्हती. मौखिक परंपरांमागील सांस्कृतिक व भावनिक जीवनाचे वर्णनात्मक दर्शन घडविणाऱ्या प्रयत्न होता. असे असले, तरी या अभ्यासामुळे लोकसाहित्याच्या अभ्यासक्षेत्राचा विचार एक अभ्यासक्षेत्र म्हणून होऊ लागला. सर्व प्रकारच्या शास्तांना प्राथमिक सामग"ी पुरविण्याचे कार्य घडू शकते, याचे भान आले. महाराष्ट्राच्या परंपरेकडे लक्ष वेधले गेले. यातच ज.र. आजगांवकर, दा.के. ओक, इरावती कर्वे, चिं.ग. जोगळेकर, य.गो. जोशी, य.न. केळकर, महादेवशास्त्री जोशी, लक्ष्मणास्त्री जोशी, ना.गो. नांदापूरकर, बोरसे, बा.वि. मिराशी, ग.रा. हवालदार, शहा, हिराचंद, शाळिग"ाम इत्यादींनी वेद, पुराणे, रामायण, महाभारत, शाहिरांचे वाड्‌मय इ. लोकप्रिय वाड्‌मयातील लोकसाहित्यत्वाचा विचार केला. त्यातून लोकजीवन हे लोकसाहित्यातून प्रकटते, लोकजीवन प्राचीनतम संस्कृतीच स्थल-काल-परिस्थितीसापेक्ष बदल स्वीकारीत वर्तमानात प्रकट होत असते, याकडे लक्ष वेधले गेले.
1950 नंतर लोकसाहित्याच्या अभ्यासाला शास्त्रीय बैठक देण्यास सुरूवात झाली. जागतिक अभ्यासक्षेत्र, भारतीय अभ्यासक्षेत्र, सैद्धान्तिक चर्चा यांकडे अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले.
"लोकसाहित्य समिती, महाराष्ट्र राज्य', "लोकसाहित्य संशोधन मंडळ, औरंगाबाद', विविध विद्यापीठांतील लोकसाहित्याचा अभ्यासक"म आणि "का.स. वाणी प्रगत अध्ययन केंद्र', "आदिवासी विकास प्रतिष्ठान', "मराठी भाषा विकास केंद्र', "विद्यापीठ अनुदान मंडळ', यांसह सर्व नियतकालिके, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, विविध संशोधन केंद्रे इ. संस्थांचा मोठा सहभाग आहे. डॉ. सरोजिनी बाबर, डॉ. दुर्गा भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ.यू.म. पठाण, डॉ. तारा भवाळकर, डॉ. गंगाधर मोरजे, द.ग. गोडसे, डॉ. मधुकर वाकोडे, डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ. व्यवहारे, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. भाऊ मांडवकर अशा अनेक संशोधकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. लोककला ऍकॅडमी, तमाशा संघटना, सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळी या संस्थांचेही योगदान आहे. याशिवाय शाहीर साबळे, शाहिर विठ्ठल उमप, शाहीर अमर शेख, शाहीर इधाते, श्री. मधुकर नेराळे, श्री. प्रकाश खांडगे, रामचंद्र देखणे, कमलाकर सोनटक्के, विविध कला केंद्रे यांचे योगदान मोठे आहे. मराठी चित्रपट, नाटके, कलापथके, लोकोत्सव, यात्रा, जत्रा यांचेही योगदान विचारात घ्यावे लागेल. एकात्म भारतीय राष्ट्राच्या परंपरेत आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करण्यात लोकसाहित्य अभ्यासक्षेत्रातील अभ्यासकांचे, कलावंतांचे आणि संस्थांचे योगदान मोठे आहे.